चौदाव्या वित्त आयोगातून शाळेस शैक्षणिक व क्रीडा साहित्य
पैजारवाडी : पैजारवाडी तालुका पन्हाळा ग्रामपंचायत कडून चौदावा वित्त आयोग विकास निधीच्या माध्यमातून विद्यामंदिर पैजारवाडी शाळेस व अंगणवाडी स शैक्षणिक व क्रीडा साहित्य प्रदान करण्यात आले.
यामध्ये विद्यामंदिर पैजारवाडी शाळा ई लर्निंग साठी ३२ इंची एल.ई. डी. टिव्ही,व क्रीडा साहित्य देण्यात आले.
अंगणवाडीतील लहान मुलांना खेळणी ,टेबल ,खूर्ची व कपाट देण्यात आले. त्याच बरोबर तीन टक्के अपंग कल्याण निधीमधून अपंग लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच सौ.अलका हिरवे, उपसरपंच उमेश हिरवे ,केंद्रप्रमुख श्री. एस. आर .माने , ग्रामसेविक, ग्रा.पं.सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य अंगणवाडी सेविका, तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.आशा पाटील आणि सूत्रसंचलन मुसळे सर यांनी केले, तर मुख्याध्यापक श्री. देशपांडे सर यांनी आभार मानले.