एकादशीला पंढरीत मुख्यमंत्री नाहीत : मराठा आरक्षणं आंदोलनाचा दणका
पंढरपूर : जोपर्यंत मराठा आरक्षणाबाबत समाजाला ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्र्यांना करू देणार नाही, अशा आशयाचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आल्यामुळे उद्याच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस विठ्ठलाच्या पूजेला उपस्थीत राहणार नाहीत, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे जनसंपदा मंत्री गिरीश महाजन सांगितले.
पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर वारकरी उपस्थित रहात असल्याने आंदोलनाचा फटका भक्ती मार्गातील वारकऱ्यांना बसू नये ,म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.