*पन्हाळा -शाहूवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी कृष्णात हिरवे यांची निवड*
नावली वार्ताहर:-
पन्हाळा -शाहूवाडी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारणसभा तात्यासाहेब कोरे सार्वजनिक ग्रंथालय जेऊर येथे खेळीमेळीत पार पडली
यावेळी संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
प्रथम पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी *श्री.कृष्णात हिरवे* (दै.पुढारी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी *श्री.दिनकर पाटील* (दै.सकाळ), तर *श्री.भीमराव पाटील* (दै.तरुण भारत) यांची सचिव पदी निवड झाली. सल्लागार म्हणून *श्री.सदाभाऊ सोळशे* यांची तर संघाचे संपर्क प्रमुखाची जबाबदारी *श्री.संजय पाटील* (दै.लोकमत) यांच्याकडे सोपविण्यात आली
या वेळी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षय, सचिव यांचा संघाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले
या बैठकीला संस्थापक अध्यक्ष प्रभाकर पाटील, सदस्य श्रीकांत कुंभार, अनिल मोरे, कृष्णात जाधव, नितीन पाटील, राम काशिद, राजू दळवी, दत्तात्रय बोबडे आदी पत्रकार उपस्थित होते.