वारणा पेन्शन धारक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
कोडोली वार्ताहर:-
सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखकर आणि स्वावलंबी व्हावं, म्हणून सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन, केंद्र शासनाच्या वतीने दिले जाते. पण ते पेन्शन मात्र तुटपुंजे आहे. त्या पैशातून ना अन्नाची गरज भागते, ना औषधाची, म्हणून या पेन्शन धारक संघनटनेला आता आंदोलनाची गरज भासू लागली आहे.
सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्याना मिळणारे पेन्शन हे फार कमी आहे. काही जणांना ते ७०० रुपये ते १००० रुपये इतके आहे. इतक्या कमी पैशात त्यांची ना औषधा ची गरज भागते, ना जेवणा खाण्याची गरज भागते. म्हणून या पेन्शन धारकांकडून पेन्शन वाढवण्याची मागणी वारंवार केली जात आहे. पण त्यांच्या या आंदोलनाला केंद्र शासन दाद देत नाही, म्हणून हे पेन्शन धारक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
या बाबत वारणा पेन्शन धारक संघटने कडून वारंवार पाठ पुरावा केल्यानंतर पेन्शन ७५०० रुपया पर्यंत वाढवण्याचं आश्वासन केंद्र शासनाने दिले होते. पण त्याची पुर्ती होत नाही, म्हणून वारणा पेन्शनधारक संघटना दिल्ली च्या जंतर मंतर वर आंदोलनाच्या तयारीत आहेत.