‘ तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी ‘ ला प्लॅटिनम मानांकन
कोडोली प्रतिनिधी :
वारणानगर ता.पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी ने पुन्हा एकदा ए .आय .सी .टी. ई. सी. आय.आय. २०१७ च्या सर्व्हेमध्ये सलग दुसऱ्यांदा प्लॅटिनम मानांकन प्राप्त करून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला. सी. आय.आय. (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज) हा उपक्रम ए .आय .सी .टी. ई या संस्थेकडून २०१२ मध्ये सुरु करण्यात आला. या उपक्रमाद्वारे देशातील कोणकोणती अभियांत्रिकी महाविद्यालये, उद्योग व कंपन्यांशी जास्तीत जास्त प्रमाणात संलग्न आहेत, याचे परीक्षण केले जाते, आणि त्यावरून त्यांना मानांकन देण्यात येते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. व्ही .आणेकर यांनी दिली.
संपूर्ण देशातून तब्बल ९५२५ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता. ए .आय .सी .टी. ई. सी. आय. आय.सर्व्हेनंतर पहिल्या 130 कॉलेजच्या यादीमध्ये तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी ने स्थान मिळवण्याची कामगिरी पार पाडली. यापूर्वी वर्ष 2016 मध्ये देखील पहिल्या १६० मध्ये स्थान मिळवण्याचा महाविद्यालयास मान मिळाला होता.
संपूर्ण महराष्ट्रात फक्त 16 महाविद्यालयांना प्लॅटिनम मानांकन देऊन गौरवण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठातील स्वायत्तता प्राप्त नसलेल्या संस्थामधून तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी हे प्लॅटिनम मानांकन प्राप्त करणारे एकमेव अभिय़ांत्रिकी महविद्यालय आहे. वैयक्तिक विभाग यादीत महाविद्यालयातील रासायनिक अभियांत्रिकी (केमिकल) शाखेने पहिल्या ३ मध्ये तसेच संगणक़ अभियांत्रिकी (कॉम्प्यूटर) शाखेने पहिल्या २० मध्ये आपले स्थान निश्चित केले.
संगणक विभागाचे प्रा.आर. बी.पाटील यांनी या सर्व्हेचे महविद्यालयाच्या वतीने मुख्य समन्वयक म्हणून काम पाहिले. तसेच त्यांना सर्व विभागातील समन्वयकांचे सहकार्य लाभले. अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. व्ही .आणेकर यांनी दिली. यावेळी सर्व विभागप्रमुख ,रजिस्ट्रार आणि सर्व समन्वयक उपस्थित होते. महविद्यालयाच्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण वारणेमधून महाविद्यालयाचे कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी श्री.वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. विनयरावजी कोरे यांचे मार्गदर्शन लाभले.