अभिनंदन पोलिसांचे आणि कौतुकही!!!!
बांबवडे : महाराष्ट्र पोलीस हा आपल्या संरक्षणासाठी रात्रंदिवस झटत आहे. दररोज वेगळा बंदोबस्त, दररोज नवी ड्युटी.
एवढे असूनही हि मंडळी हसत मुखाने आपली कर्तव्य बजावत आहेत. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. तसं असत तर अनेक माणसे मारली गेली असती. पण संयम राखून केलेली त्यांची कार्यवाही वाखाणण्याजोगी आहे. वरिष्ठांचे आदेश, आणि सामान्य परिस्थिती यांच्याशी समन्वय साधत त्यांनी नेभाव्लेली कर्तव्य कौतुकास्पद आहेत.अनेक बंदोबस्त करीत आपला संयम राखत केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. पुनश्च अभिनंदन पोलिसांचे आणि कौतुकही.