पिशवीचे सुपुत्र श्री.पी.एस.पाटील यांची महावितरणच्या मुख्य जनसंपर्क पदी पदोन्नती
बांबवडे : पिशवी ता.शाहुवाडी चे सुपुत्र श्री.पी.एस.पाटील यांची महावितरण च्या मुख्य जनसंपर्क अधिकारी पदी निवड झाली आहे. विद्युत आणि महावितरणचे व्यवस्थापन आणि प्रसार माध्यमे तसेच ग्राहक व इतर घटकांशी अतिशय चांगला संपर्क असा नावलौकिक आहे. श्री.पी.एस.पाटील हे सरळ सेवेतून महावितरणच्या जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती झालेली होती. त्याचबरोबर त्यांनी दै.पुढारी ला हि पत्रकार म्हणून काम केले होते. त्यांच्या कौशल्याने त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर झेप मारली आहे आणि तालुक्याच नाव , आपल्या गावच नाव गाजवलं आहे. याबद्दल त्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.