लोकमत चे पत्रकार राजाराम कांबळे यांना पितृशोक
मलकापूर प्रतिनिधी : पेरीड तालुका शाहुवाडी येथील सहदेव श्रावण कांबळे वय ७५ वर्षे यांचे दु:खद निधन झाले आहे. शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व दैनिक लोकमत चे मलकापूर प्रतिनिधी राजाराम कांबळे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा,एक मुलगी, सून,नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन गुरुवार दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पेरीड इथं आहे.