सामाजिक

जवान रमजान हवालदार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मलकापूर प्रतिनिधी :
टेकोली तालुका शाहुवाडी येथील 148लाईट एडीचे हावलदार रमजान महमद हावलदार यांना हजारोंच्या साक्षीनं साश्रू पर्ण नयनानी अखेरचा निरोप देण्यात आला. देशसेवा बजावत असताना त्यांना विरमरण आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी टेकोली गावात जनसागर उसळला होता.
टेकोली तालुका शाहुवाडी येथील रमजान महमद हावलदार हे आसाम डोकलाम येथे लष्करी सेवेत कार्यरत होते. त्यांचे पार्थीव घेऊन आलेले त्यांच्या युनिटचे सहकारी यांनी दिलेले माहीतीनुसार हावलदार या पदावर कार्यरत असलेले रमजान महमद हावलदार हे आसाम डोकालाम येथे 148लाईट एडी रेजीमेंट या ठिकाणी जुलै पासून सेवा बजावत होते. त्या परिसरात करत असलेल्या पेट्रोलिंग विभागाचे ते प्रमुख म्हणुन काम पहात होते. या टीम मध्ये एकुण आठ जवान कार्यरत होते. त्या ठिकाणी झालेल्या चकमकीत ते व त्यांचे दोन सहकारी जखमी झाले होते. या सर्वांना लष्करी इस्पीतळात उपाचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान रमजान हावलदार यांना वीरमरण आल्याची माहीती सोबत आलेले जवान यांनी दिली.
====अंत्ययात्रेत हजारो सहभागी====
हवालदार रमजान महमद हवालदार यांचे पार्थीव सकाळी आठ वाजता त्यांच्या उचत लहिन येथील घरी काही काळ पार्थीव दर्शनासाठी ठेवले, व नंतर त्यांच्या मुळ गावी टेकोली येथे पार्थीव येथे नेण्यात आले. या वेळी मलकापूर पंचक्रोशीतील नागरीकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. नंतर त्यांच्या पार्थीवाची सजवलेल्या ट्रॅक्टर मधून शाहुवाडी पासून टेकोली पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्यायात्रेत हजारो नागरीक सहभागी झाले होते. कोळगाव येथे ही रस्त्याच्या दुतर्फा उभा राहुन नागरीकांनी अंत्यदर्शन घेतले. शाहु हायस्कूल शाहुवाडी व जुगाई हायस्कुल पणुद्रें या विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी ए. के. पाटील व हायस्कूलच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मानवंदना दिली .
====ह्रदय हेलावणारा आक्रोस====
रमजान हावलदार यांचं पार्थीव त्यांच्या घरी आणल्यावर आपल्या मुलाचा मृत देह पाहुन, आईने घातलेली साद आणि आपल्या पतीच पार्थीव पाहुन पत्नी फरझाना (यासमीन) हावलदार यांनी फोडलेला हंबरडा आणि सातवीत शिकत असलेली सानिया ,पाचवीत शिकत असलेली जेब तर तिसरीत शिकत असलेल्या रेहान यांनी आपल्या पित्याचा निपचित पडलेला देह पाहून आपल्या पित्याला मारलेली हाक ह्रदय हेलावून टाकत होते.
====सारा गाव हळहळला====
हावलदार रमजान महमद हावलदार यांचे पार्थीव टेकोली गावात येताच उपस्थित महीला ,ग्रामस्थ यांना ही शोक आनावर झाला होता.
त्यांचे पार्थीव टेकोली येथे आल्यानंतर गावातील अबालवृध्दासह युवक ,पदाधिकारी सहभागी झाले. एन. सी. सी. च्या विद्यार्थी यांनी वीर जवान अमर रहे अशा घोषणात स्मशान भूमीत त्यांचे पार्थीव आणण्यात आले. या ठिकाणी आ.सत्यजित पाटील , बांधकाम सभापती सर्जेराव पाटील , उदय साखरचे संचालक रणवीरसिंह गायकवाड, जि.प सदस्य हंबीरराव पाटील, ,सभापती डॉ. स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील , सरपंच सुरेखा संजय जाधव, जयवंतराव काटकर , माजी उपसभापती महादेव पाटील, पांडुरंग पाटील , जालिदंर पाटील, जिल्हानियोजन समिती सदस्य प्रविण प्रभावळकर, पं स सदस्य अमर खोत, सुरेश पारळे, माजी सरपंच रंगराव खोपडे , उदय साखरचे संचालक प्रकाश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख दत्तात्रय पोवार, अफजल देवळेकर, माजी नगरसेवक संजय मोरे. येळाणे उपसरपंच सुरेश पटेल, उपसरपंच प्रकाश कांबळे , ए के पाटील , माजी सैनिक संघटना , यांच्यासह तहसिलदार चंद्रशेखर सानप , सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र पुणेचे आनंद बांद्रे, जिल्हा सैनिक कार्यालय कोल्हापूरचे चंद्रशेखर पांगे, दिपक शेळके, पोलीस निरिक्षक अनिल गाडे , पी एस आय प्रशांत यम्मेवार, पार्थीव घेऊन आलेले नाईक सखाराम जगताप, हावलदार शैलेंद्र राजपूत , 109आठ ए मराठा लाईट बटालियनचे नाईक विकास तळप , सत्यजित गावडे, शिपाई अमित चव्हाण, मलकापुर मुस्लीम जमायतीच्या वतीन बाळू जमादार, गुलाब भटारी आदिसह नागरीकांनी पुष्प चक्र वाहुन रमजान हावलदार यांचे अंत्यदर्शन घेतले .
धार्मीक विधीनुसार त्यांचे पार्थीव दफन करण्यात आले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!