विकास कामात राजकारण न आणल्यास आर्थिक उन्नती- माजी आमदार मानसिंगराव नाईक
शिराळा प्रतिनिधी : रेड येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण लोकप्रतिनिधी असताना सोडवला असून, आता येथील शेती पाण्याचा प्रश्न विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या माध्यमातून शेती पाणी योजना राबवून सोडवण्याचा आपला प्रयत्न असून, येथील नागरिकांनी यात राजकारण न आणता सहकार्य केल्यास, येथील शेती विकसित होऊन आर्थिक स्तर उंचावेल , असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
रेड ( ता. शिराळा ) येथील जिल्हा परिषद सदस्या आशाताई झिमुर यांचे निधीतून होणारी बौद्ध वस्तीतील रस्ता नूतनीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते .
नाईक पुढे म्हणाले की , मी लोकप्रतिनिधी असताना, विहीर खुदाई करून येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला, मात्र इथे कोणीतरी येऊन आपणच ही योजना केल्याचे सांगत उदघाटना चे नारळ फोडत आहेत. समाज मंदिर मंजूर केले याच बरोबर येथील शेती पाणी प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने कापरी , इंगरुळ , रेड अशी योजना केली होती. कोणाचे तरी ऐकून येथील काही शेतकऱ्यांनी विरोध केला, त्यामुळे येथील शेती विकसित झाली नाही. तुम्ही शेती विकासापासून दूर गेला. याउलट कापरी , इंगरुळ येथील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. आज त्यांनी ऊस, दूध , बागायत शेती, जोड धंदे करून विकास साधला आहे.
कारखान्याच्या माध्यमातून शिराळा येथील काही व रेड येथील शेतीला पाणी मिळावे, यासाठी योजना राबवणार आहे. त्याचा सर्वे चालू आहे. त्यामुळे आता राजकारण न आणता शेतकऱ्यांनी आपले हित पाहून सहकार्य करावे, व शेती – घराचा विकास साधावा , असे आवाहन त्यांनी यावेळी केले .
यावेळी विजय झिमुर म्हणाले की , या गावातील दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत जवळपास वीस लाखाचा निधी आहे. त्यामुळे अनेक विकास कामे यातून करता येणार आहेत. स्मशानभूमीसाठी पाच लाखाचा निधी आहे, मात्र जागा नसलेने हे काम थांबले आहे. त्यामुळे कोणी दानशूर व्यक्तीने जागा उपलब्ध करून दिल्यास हाही प्रश्न सुटणार आहे, असे सांगितले .
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य के.डी. पाटील , तालुका काँग्रेस अध्यक्ष आनंदराव पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या आशाताई झिमुर, पंचायत समिती सभापती मायावती कांबळे , सरपंच वंदना जाधव, अशोक पाटील , संजय पाटील, शरद पाटील , अशोकदादा पाटील , विक्रम पाटील , रुपाली कापूरकर , उज्वला पाटील, माजी सरपंच यशवंत पाटील , रोहित झिमुर , दीपाली कापूरकर , महादेव झिमुर ,सहदेव झिमुर ,उज्वला सातपुते , शिवाजी जाधव , कांताताई सातपुते, सागर घेवदे , अविनाश पाटील , अभिजित यादव ,तानाजी कुंभार , संजय महिंद , गणेश दिवटे , सूर्यकांत गायकवाड , पोपट गवळी , सुरेश शिंदे ,अरुण सातपुते , शिवाजी सातपुते, दिनकर पाटील, रमेश पाटील,शिवाजी जाधव , विश्वास जाधव , कार्यक्रमाचे नियोजन मनस्वी फौंडेशन , भीमसेना नवतरुण मंडळ यांनी केले होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुनील तांदळे यांनी केले .