रेनॉल्ट ची ” डस्टर ” आपल्या दारी : गुरुनाथ ऑटोमोबाईल
बांबवडे : येथील गुरुनाथ ऑटोमोबाईल्स मध्ये ‘ रेनॉल्ट ‘ कंपनीच्या डस्टर गाड्यांसह इतरही कार्स आपल्याला बांबवडे इथं उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ग्रामीण जनतेला आत्ता कोल्हापूरला जाण्याची गरज नाही.तसेच सर्वसामान्यांना परवडतील अशा २.७९ लाख पासून सुरु असलेल्या कार इथं आपण बुक करू शकतो. युनिक ऑटोमोबाईल च्या गुरुनाथ ऑटोमोबाईल मध्ये या आरामदायी कार चे बुकिंग करण्यात येईल. अशी माहिती युनिक ऑटोमोबाईल चे बिझनेस हेड बी.के.शिंदे यांनी दिली.
आज शाहुवाडी पंचायत समितीच्या सभापती सौ.अश्विनी पाटील यांच्या हस्ते फीत कापून या बुकिंग पॉइन्ट चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संदीप पाटील यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी गुरुनाथ ऑटोमोबाईल्स चे मालक श्रीकांत सिंघण, शशिकांत सिंघण, युनिक चे पदाधिकारी ,तसेच गावचे उपसरपंच सयाजी निकम, रोहन फाटक, उदय किटे, दत्तात्रय यादव, शरद बाऊचकर, अभयसिंह चौगुले, सचिन घोडे-पाटील व मान्यवर व्यापारी ,तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.