देवाळे विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.२१ %
पैजारवाडी प्रतिनिधी :-
देवाळे (ता पन्हाळा) येथील देवाळे विद्यायल देवाळे विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.२१ टक्के लागला आहे.
कु.प्राजक्ता संजय पाटील हिने ९७.८० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले आहे. कु.प्राजक्ता ब्रह्मदेव पाटील हिने ९५.६० टक्के गुण मिळवून दुसरा, तर कु.श्वेता भिकाजी जाधव हिने ९४.८० टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाचे यश प्राप्त केले आहे.
या सर्व यशस्वी संस्थेचे चेअरमन, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.