RN फर्निचर चा ५ वा वर्धापनदिन : तरुणाई उद्योगाकडे वळतेय…
बांबवडे : तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता,स्वत:चा व्यवसाय सुरु करावा, असे अनेकजण सांगत असतात. परंतु बांबवडे येथील आर.एन. फर्निचर चे मालक राहुल निकम आज आपल्या व्यवसायाचा ५ वा यशस्वी वर्धापन दिन संपन्न करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने हार्दिक अभिनंदन.
यावेळी बोलताना राहुल निकम यांनी आपल्या ग्राहकांना,तसेच हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

तरुणांनी उद्योग, व्यवसाय केवळ सुरु करू नये, तर तो आपल्या कष्टाने यशस्वी देखील करावा, हे म्हणणे येथील तरुण उद्योजक राहुल निकम यांनी सत्यात उतरवले आहे. पाच वर्षांपूर्वी सुरु केलेला फर्निचर विक्री चा व्यवसाय यशस्वीपणे पाच वर्षे चालविला आहे.
त्यांनी स्वकष्टाने आपला ग्राहक तयार केला, आणि जपला देखील. खरोखरच सध्या तरुणाई व्यवसायाकडे वळू लागली आहे. एकेकाळी व्यापार हा केवळ मारवाडी समाजाने करावा, आणि मराठी लोकांनी नोकऱ्या कराव्यात. हे म्हणणे आज या तरुणांनी पुसून काढले आहे. व्यवसाय करायचा ठेका केवळ एका समाजाला नाही, तर नव्या पिढीचे, नव्या दमाचे, नवे तरुण देखील आपला व्यवसाय यशस्वी करू शकतात, हे येथील श्री राहुल बाजीराव निकम यांनी करून दाखविले आहे.

या फर्निचर मध्ये बेड, खुर्च्या, कपाट,ऑफिस टेबल, ड्रेसिंग टेबल अशा प्रकारचे घरगुती वापराचे फर्निचर विक्री त्यांच्या इथं यशस्वी पणे होत आहे. त्याचप्रमाणे लग्न समारंभात लागणारे रुखवत चे साहित्य देखील इथं विक्रीस ठेवले जात आहेत. याठिकाणी नव्या फॅशन चे फर्निचर देखील माफक दरात उपलब्ध आहेत. तेंव्हा एकदा भेट द्या आणि खात्री करा, असे आवाहन आर.एन. फर्निचर चे मालक राहुल निकम यांनी केले आहे. अधिक माहिती साठी ९७६६३९१६६६, ९९७५११८५८५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.