वारणानगर येथे आर.टी. ओ कॅम्प संपन्न
कोडोली प्रतिनिधी:
देशामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण जास्त असणाऱ्या यादीत महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांकाचा दर्जा आहे. म्हणून प्रादेशिक परिवहन मंडळाकडून दरवर्षी जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. आणि वाहन चालकांचे प्रबोधन केले जाते. या अभियानाअंतर्गत वारणानगर (ता.पन्हाळा) येथे आर.टी. ओ कॅम्प दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित वाहन चालकांना मार्गदर्शन केले.
राज्यभरात दर वर्षी रस्ते अपघात अनेक जण मृत्यू पावतात, तर अनेक जण जखमी होतात. काहीना कायमचे अपंगत्व येते. याला उपाय योजना म्हणून, वाहन चालकांचे प्रबोधन करण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन मंडळाच्या वतीनं आणि पोलीस प्रशासना च्या वतीनं दर वर्षी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रबोधन केले जाते. नुकतेच कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन मंडळाच्या वतीने वारणानगर येथील आर. टी. ओ. कॅम्प मध्ये वाहन चालकांना वहातुकीचे नियम, बंधन, अपघाताची कारणे आणि त्यांच्या उपाय योजना याविषयी मोटर वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील, प्रशांत जाधव, तसेच सहायक मोटर वाहन निरीक्षिका तृप्ती निकम यांनी उपस्थित वाहन चालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी १०८ आरोग्य सेवेचे डॉ.अभिजित जाधव यांनीही रस्ते अपघात आणि त्या विषयी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.