शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती पदी सौ.अश्विनी पाटील (पिशवी पंचायत समिती मतदारसंघ )
शाहूवाडी : शाहुवाडी पंचायत समिती च्या सभापती पदी पिशवी पंचायत समिती च्या सौ अश्विनी संदीप पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड संपन्न झाली.
सभापती निवडीनंतर पंचायत समिती सभागृहात नुतन सभापती सौ अश्विनी पाटील यांचा, माजी आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना मा.आ.बाबासाहेब पाटील म्हणाले कि, अशीच एकी कायम ठेवून तालुक्याच्या विकासाला गती देवून, सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे.
.यावेळी जि प सदस्य हंबीरराव पाटील, पंचायत समिती सदस्य पांडूरंग पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, माजी उपसभापती नामदेव पाटील सावेकर,यांनी मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी नुतन सभापती सौ अश्विनी पाटील म्हणाल्या कि, माजी आ.बाबासाहेब पाटील, आमदार सत्यजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वाच्यां सहकार्याने तालुक्याच्या सर्वांगिण विकासाला विशेष गती देणार आहोत.
याप्रसंगी माजी सभापती डॉ. स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील, पं. स. सदस विजय खोत, पं. स. सदस्या लताताई पाटील, सौ सुनिता पारळे, पं. स. सदस्य पांडूरंग पाटील, संदीप पाटील, नामदेव गिरी, अमर पाटील, दत्ता पोवार, नगरसेवक सुहास पाटील, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील, उपसरपंच संभाजी गुरव, मारूती पाटील, तानाजी पाटील, नानासो पाटील, कृष्णात लवंगारे, विकास पाटील, माजी सरपंच बाजीराव पाटील, माजी डे. सरपंच संदिप पाटील, तानाजी चौगले, केशव पाटील, युवराज पाटील, भगवान नांगरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.