शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने करुंगळे सरपंच व साळशी सदस्या यांचा सत्कार
बांबवडे : शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे माधव कळंत्रे यांची करूंगळे ग्रामपंचायत च्या सरपंच पदी , व संघाचे उपाध्यक्ष सुभाष बोरगे(दै.पुण्यनगरी ) यांच्या पत्नी सौ. वैशाली सुभाष बोरगे यांचा सलग दुसऱ्यांदा साळशी ग्रामपंचायत च्या सदस्य पदी निवड झालेबद्दल शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री अनिल गाडे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
हा सत्कार शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल गाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक मुकुंद पवार(सा. शाहुवाडी टाईम्स,संपादक ), संघाचे कार्याध्यक्ष आनंदराव केसरे (दै.पुढारी ), अध्यक्ष शाम पाटील (दै.सकाळ), सर्वश्री डी.आर.पाटील (दै.सकाळ), अनिल पाटील ( दै. पुढारी ), चंद्रकांत मुदुगडे (दै. महाराष्ट्र टाईम्स ), संजय पाटील (दै.लोकमत ), राजाराम कांबळे(दै. लोकमत ), संतोष कुंभार( दै.तरुण भारत ), श्रीमंत लष्कर (दै. पुढारी ),उमेश नांगरे( दै.पुढारी ), रमेश डोंगरे ( दै.सम्राट ),वसंत पाटील( दै.सकाळ ), , चंद्रकांत शेळके (दै. तरुण भारत), संजय जगताप ( दै.महासत्ता ), सुखदेव पाटील( दै. तरुण भारत ), आदी पत्रकार उपस्थित होते.