सातवे फाट्यानजीक ट्रॉली पलटी झाल्यानेअपघात :वहातुक तीन तास ठप्प
पैजारवाडी प्रतिनिधी : बोरपाडळे तालुका पन्हाळा इथं कोडोली-बोरपाडळे मार्गावर ऊस भरलेली ट्रॉली पलटी झाल्याने रस्ता तीन तास खोळंबल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
कोडोलीहून नामदेव मतसागर रा.कोडोली यांच्या मालकीचा हा ट्रॅक्टर ट्रॉली ऊस भरून बांबवडे कडे चालला असता ,बोरपाडळे जवळील सातवे फाट्यानजीक ,खडके स्कूल समोरील रस्त्याच्या चढाला ट्रॅक्टर लागला असता, ट्रॉली चा हुक तुटल्याने ट्रॉली रस्त्यावर पलटी होवून अपघात झाला.ट्रॉली रस्त्यावर आडवी झाल्याने वहातुक ठप्प झाली. ग्रामस्थांच्या सहकार्याने वहातुक सातवे फाट्यावरून बोरपाडळे गावातून कोडोलीकडे काढण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत वहातुक ठप्प होती.