‘ ज्यांना मतदारसंघातील गावेच माहित नाहीत, ती विकास काय करणार? ‘-आमदार सत्यजित पाटील सरुडकर
बांबवडे : जी मंडळी आपल्या पूर्वजांच्या संपत्तीचा मते विकत घेण्यासाठी वापर करून राजकारण करतात ,अशा मंडळींना खड्यासारखे वेचून बाजूला टाका. असे मत आमदार सत्यजित पाटील आबा यांनी व्यक्त केले.
सावर्डे पैकी गमेवाडी येथील रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योगपती आनंदराव भेडसे यांनी प्रास्ताविक केले.
आमदार सत्यजित पाटील पुढे म्हणाले कि, ज्यांना आपल्या मतदारसंघातील गावांची नावे नित माहित नाही टी मंडळी मतदारसंघाचा विकास काय करणार?, आम्ही गावातील मते बघून कधी विकासकामे केली नाही तर गावांची गरज बघून विकासकामे केलीत.विरोधकांनी किती विकासकामे केली हि एका व्यासपीठावर येवून सांगावे. आम्ही विकासकामात कमी पडलो तर राजीनामा देवू ,असेही आमदार सत्यजित पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.
दरम्यान आमदार सत्यजित पाटील यांनी सावर्डे पैकी गमेवाडी येथील रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण या कामासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. येथील लोकवस्ती जरी कमी असली तरीही तेथील लोकांची गरज ओळखून आमदारांनी हा निधी मंजूर केला आहे.
दरम्यान यावेळी बाबासाहेब पाटील सरुडकर दादा, स्व.संजयसिंह गायकवाड दादा व स्व.माजी खास. उदयसिंगराव गायकवाड याच मंडळींनी तालुक्याचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, असेही आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, आगामी निवडणुकीत सुद्धा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसह सत्यजित आबा यांच्या पाठीशी ठाम राहणार आहोत.
या कार्यक्रम प्रसंगी माजी सभापती जयसिंगराव भाडळेकर , माजी उपसभापती नामदेवराव पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेवराव गिरी, आदींनी मनोगते व्यक्त केली.
माजी सभापती महादेवराव पाटील साळशीकर, जि.प.सदस्य हंबीरराव पाटील, सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्या अश्विनी पाटील, सुनिता पारळे, दगडू पाटील घोटवडेकर,दत्ताजी राणे, नगरसेवक सुहास पाटील, अमर पाटील, रामचंद्र लाड, सर्जेराव किटे, मोहन पाटील, बळीराम ठाणेकर, युवराज पाटील, आदी मंडळी उपस्थित होते.