शब्दाली चौगुले ९३.४० %गुण मिळवून दहावीत उत्तीर्ण : पत्रकाराच्या मुलीचे घवघवीत यश
शिराळा : सद्गुरू आश्रम शाळा शिराळा येथील शब्दाली शिवाजीराव चौगुले, हिला दहावीत ९३.४० % गुण मिळाले असून ,ती शाळेतून दुसरी आली आहे. यानिमित्त समाजातील सर्वच स्तरावरून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शब्दाली हि दै.सकाळ चे पत्रकार शिवाजीराव चौगुले यांची मुलगी आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलीसुद्धा अभ्यासाच्या बळावर यशाच्या शिखराकडे जातात.याचेच उदाहरण म्हणजे शब्दाली आहे.