गोगवे इथं शहीद सावन माने यांचा प्रथम स्मृतिदिन संपन्न
बांबवडे : सह्याद्री च्या पोटचा गोळा मातृभूमी साठी समर्पित होवून एक वर्ष पूर्ण झालं. शहीद जवान सावन बाळकू माने.
गेल्या वर्षी याच दिवसात गोगवे गावात नव्हे, तर अवघ्या जिल्ह्यात हलकल्लोळ माजला होता. प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा बंध तोडून वहात होत्या. बाळकू माने आणि कुटुंबाने तर हंबरडा फोडला होता. कारण त्या माता-पित्यांच्या पोटचा गोळा भारत मातेसाठी समर्पित झाला होता. अवघ्या २२ वर्षाच लेकरू हिमतीनं लढलं, आणि समर्पित झालं.
त्यांच्या बलिदानाला एक वर्ष पूर्ण झालं. तिथीनुसार त्यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन संपन्न झाला. यानिमित्ताने शहीद सावन माने यांचे ” शहीद स्मारक ” उभारण्यात आलं.
पुन्हा एकदा त्या माता-पित्यांना त्या आठवणींच्या भूतकाळात जावं लागलं. पुन्हा एकदा सावन बाळकू माने गावाच्या आणि पंचक्रोशीच्या हृदयातून डोकावू लागले. आणि हलकल्लोळ माजला.