‘ शाहूवाडी पोलीस ठाणे ‘ ला ‘ ISO ‘ मानांकन
शाहूवाडी : शाहुवाडी पोलीस ठाणे ला ‘ ISO ‘ मानांकन प्राप्त झाले असून, शाहूवाडी ग्रामीण पोलीस उपाधीक्षक आर.आर. पाटील यांच्या हस्ते ‘ ISO ‘ चे प्रमाणपत्र शाहूवाडी पोलीस ठाणे चे नवीन पोलीस निरीक्षक श्री. मनोहर रानमळे यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वीकारले.
शाहूवाडी पोलीस ठाण्यासह कोडोली, पन्हाळा, गगनबावडा, कळे आदी पोलीस ठाण्यांना सुद्धा ‘ ISO ‘ मानांकन प्राप्त झाले आहे. यापैकी कोडोली,पन्हाळा, कळे या पोलीस ठाण्यांना ‘ ISO ‘ सहित ‘ स्मार्ट ‘ हे मानांकन सुद्धा मिळाले आहे.
हे मानांकन पोलीस ठाण्याला त्यांच्या योग्य आणि सुटसुटीत अॅडमिनीस्ट्रेशन,कागदपत्रांची योग्य ठेवण, आदी कामांच्या मुळे हे मानांकन देण्यात आले आहे. पोलीस ठाण्याची इमारत जुनी असूनही इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जपलेली कागदपत्रांची शिस्त हे इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे श्रेय आहे. यात नुकतीच बदली झालेले पोलीस निरीक्षक अनिल गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सिंहाचा वाट आहे. असे पोलीस उपाधीक्षक आर.आर. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
हे मानांकन SOR या कंपनीच्या वतीने केलेल्या निरीक्षणातून देण्यात आले आहे. ह्याचे निरीक्षण समीर रुपलग, शेजल रुपलग यांच्या सहित, सहकाऱ्यांनी केले आहे.
यावेळी नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक संजीव झाडे, प्रशांत यम्मेवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.