आज कोल्हापूर येथील ‘ शिवाजी पूल ‘ वाहतुकीस बंद
कोल्हापूर प्रतिनिधी: बांधकाम विभागच्या वतीने येथील शिवाजी पुलाच्या स्टक्च्रलर ऑडीट करण्यात येणार असल्याने, हा पूल आज बुधवारी पूर्ण दिवस बंद राहणार. या पुलावरून नुकतीच एक मिनी बस खाली जाऊन झालेल्या अपघातात १३ जण दगावले होते. तसेच हा पूल कुमकुवत झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाने ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे.