सामाजिक

मलकापूर-मुंबई शिवशाही बस सुरु होणार ?

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातून लवकरच मलकापूर-मुंबई शिवशाही एसटी बस सुरु होणार आहे. यासाठी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी तशा आशयाचे पत्र सुद्धा मलकापूर आगाराला दिले आहे.
शाहुवाडी तालुक्यातील बरीच मंडळी मुंबई सारख्या शहरात नोकरी धंद्यानिमित्त स्थायिक झाली आहेत. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या असून, या काळात बरीच मंडळी आपल्या गावाकडे येत असतात. त्यामुळे सहाजिकच गर्दी वाढते. आणि तिकिटे मिळेनाशी होतात. अशा परिस्थितीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्स वाले उचलतात. प्रवासाचे भाडे दुपटी, तिपटीने नागरिकांकडून घेतले जाते. आणि सुट्ट्या मर्यादित असल्याने जनता नाईलाजास्तव एवढे भाडे देवून प्रवास करतात. तसे पाहिले असता, हि जनतेची लूटच म्हणावयास हरकत नाही. यासाठीच आमदार सत्यजित पाटील यांनी मलकापूर – मुंबई शिवशाही बस सुरु करण्यासंदर्भात मलकापूर आगाराला पत्र दिले आहे.
आमदारांच्या पत्राचा उपयोग झाल्यास सामन्य जनतेची पिळवणूक थांबेल,आणि जनतेचे आशीर्वाद आमदार पाटील यांना मिळतील,यात शंका नाही.
परंतु एसटी खात्याचे मलकापूर आगर एवढे निगरगठ्ठ आहे कि,आमदारांच्या पत्राला किती सन्मान देतील, हि शंकेची बाब आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!