पाटण्यात शॉर्टसर्किट ने आग :२४ लाखाचे नुकसान
मलकापूर प्रतिनिधी :
पाटणे तालुका शाहुवाडी येथे शॉर्टसर्किट ने लागलेल्या आगीत चार शेतकरीबाधंवाचे सुमारे 24 लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली .या आगीत ऊसाच्या चिफाडाच्या बडम्या ,जनावराचेंशेड आदि आगीच्या भक्ष्य स्थानी पडले तर एक म्हैस किरकोळ जखमी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार पाटणे तालुका शाहुवाडी येथील सावे -पाटणे रस्त्या वरील शोभा शामराव पाटील, शामराव तुकाराम नांगरे, सदाशिव केशव पाटील,अशोक केशव पाटील या चार शेतकरी यांच्या गुऱ्हाळ घरा शेजारी असणाऱ्या ऊसाची बडमी ,जनावरांचे शेड यांना दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली.
दरम्यान शोभा पाटील यांच्या बडमी वरून विज वितरण कंपनीची 33केव्हीची तार गेली असून, जवळच विद्युत विभागाची डी पी आहे. दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीची माहिती लागताच नागरिकांनी घटना स्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ऊन वारा यामुळे आगीने उग्र रूप धारण केल्याने आग विझ वताना अडचण निर्माण होत होती. आग आटोक्यात आणण्यासाठी मलकापूर नगरपरिषदेच्या दोन आग्नीशामक ,व विश्वास साखर कारखाना यांच्या अग्निशमन गाड्यानी आग आटोक्यात आणली . या आगीत शोभा पाटील यांचे दहा लाखाचे, शामराव नांगरे यांचे नऊ लाखाचे, सदाशिव पाटील व अशोक पाटील या दोन बंधूचे पाच लाखाचे असे एकुण चोवीस लाख रुपये असे नुकसान झाले असून, या घटनेची विजवितरणने दखल घेणे गरजेचं असल्याची चर्चा नागरिकांतून उमटत होती.