‘ नागमणी चषक ‘ अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेस सुरुवात
शिराळा प्रतिनिधी : येथे ‘ नागमणी चषक ‘ अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेस सुरुवात झाली. ‘ विश्वास ‘ व ‘ विराज ‘ उद्योग समूहाचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते उदघाटन झाले.
यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष चिमनभाऊ डांगे, वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सह सचिव धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलावडे, तालुक्याचे माजी सभापती भगतसिंग नाईक, विश्वास चे संचालक विश्वास कदम, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, देवेंद्र पाटील, गजानन सोनटक्के, दस्तगीर व रफिक अत्तार, गौतम पोटे, सुनील कवठेकर, खलील मोमीन, रामचंद्र यादव, अशोक पाटील, संपत कुरणे, सुदाम इंगवले, मोहन जिरंगे, लालासो तांबीट, सुजित यादव, राजू निकम, विनोद घाटगे, राजू सदफळे, महादेव कुरणे, बश्वेश्वर शेटे, वैभव कुंभार, वैभव गायकवाड, दीपक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.