आई नसलेल्यांची आई, म्हणजे सिंधुताई माई : ‘ सिंधुताई संकपाळ ‘ यांचे व्याख्यान गुरुवारी बांबवडे त …
बांबवडे : ‘ आई नसलेल्यांची आई, म्हणजे सिंधुताई माई ‘. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सध्याच्या वेगवान युगात कुणालाच कुणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण अशाच युगात एक माऊली ज्यांना आईचा पदर मिळाला नाही , ज्यांना त्या पदराची ऊब मिळाली नाही ,अशांना जिव्हाळ्याचा पदर देणाऱ्या माउली म्हणजे ‘ सिंधुताई संकपाळ ‘ होय. हि माऊली गुरुवार दि.२६ एप्रिल रोजी आपल्या प्रबोधनातून,मायेचा जिव्हाळा देण्यासाठी बांबवडे इथं येत आहेत. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम बांबवडे येथील जनावरांचा बाजार इथं संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बांबवडे ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.
” स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ” हे जरी खरे असले तरी सिंधुताई ‘ माई ‘ यांनी हि उणीव भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याचबरोबर एका स्त्री मध्ये अद्वितीय शक्ती असते, हे माईंनी सिद्ध करून दाखवले आहे. यातून समस्त महिला भगिनींसाठी एक आदर्श मॉडेल त्यांच्यासमोर ठेवले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत, माईंनी फुलवलेली मायेची बाग हि सगळ्यांसाठीच एक अद्वितीय उदाहरण आहे. अशा माईंचे दर्शन घेण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन हि ग्रामपंचायत बांबवडे च्या वतीने करण्यात आले आहे.