मध्यरात्री पासून एसटी संप : कर्मचाऱ्यांची धरपकड
मुंबई : काळ मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीर असून,सदरच्या संपाची कोणतीही नोटीस कर्मचाऱ्यांनी दिली नव्हती. निवेदन न देता संप करून प्रवाशांना वेठीस धरणे बेकायदेशीर आहे. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मान्य नसेल तर त्यांनी औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागावी, अस वक्तव्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.
दरम्यान , एसटी चा संप मोडून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची धरपकड सुरु आहे.
या संपामुळे अनेक ठिकाणी वहातुक ठप्प झाली आहे.