एस.टी.खाली सापडुन एस.टी.कर्मचा-याचा मृत्यु
शिराळा : येथील एस टी बस स्थानकावर लावत असताना प्रवाश्यांचा धक्का लागून एस.टीच्या पुढील चाकाखाली सापडुन गंभीर जखमी झालेल्या शिराळा आगाराचे शिपाई जयंत रंगराव पाटील(वय५५ रा.कामेरी ता.वाळवा) यांचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला. ही घटना दि.२० डिसेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. एस.टी.खाली सापडुन एस.टी.कर्मच्या-याचा मृत्यु झाल्याने कर्मचारी व प्रवाशांच्यातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलीसातुन समजलेली माहिती अशी की,चालक अवधूत हसबनिस(वय २९ वर्षे )व वाहक किशोर जाधव हे शिराळा वाकुर्डे ही बस क्रमांक एम एच १२ सी.एच.७५९७ फलाटावर लावत होते. त्याठिकाणी गर्दी होती. त्यामुळे बस लावत असतानाच विद्यार्थी,प्रवाशांनी गा़डीत चढण्यासाठी धावपळ सुरु केली. त्यावेळी शिराळा आगारातील शिपाई जयंत पाटील हे कार्यालयाकडे निघाले असता, त्यांना प्रवाशांचा धक्का लागला. त्यांना अगोदर अर्धांगवायू होता. त्यामुळे तोल जाऊन बसच्या पुढील चाकाखाली ते पडले. त्यांच्या पायावरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना शिराळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, प्रकृती गंभीर असलेने पुढील उपचारासाठी इस्लामपूर येथील रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीक फौजदार बी.एम.घुले हे करत आहेत.