तलाठी सुभाष पाटील यास लाच घेताना अटक
शिराळा,ता.२८: शिराळा येथील तलाठी सुभाष श्रीपती पाटील (५१) रा. इस्लामपूर. मुळ गाव ऐतवडे खुर्द. (ता वाळवा) यास खरेदी जमीनीची नोंद करणेसाठी पाच हजार रुपये लाच घेताना, लाचलुचपत खाते यानी रंगेहाथ तलाठी कार्यालय शिराळा येथे दुपारी चार वाजता पकडले.
या बाबत समजलेली माहिती अशी की, पावलेवाडी येथील सुजित जयसिंग देसाई सर्वे नं ६५/३ मधील १.७५ गुंठे. ही त्यांच्या भावाने खरेदी केली होती. या जमिनीची नोंद करणेसाठी २७ डिसेंबरला तलाठी सुभाष पाटील यांची भेट तक्रारदारांनी घेतली. या वेळी तक्रारदार विकास जयसिंग देसाई यांचे ही नोंद घालणे साठी सहा हजाराची मागणी तलाठी सुभाष पाटील यांनी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत खातेकडे या बाबत तक्रार दिली. त्या नुसार कोल्हापूर येथील लाचलुचपतने खातेनिहाय सापळा रचून विकास देसाई यांचे कडून लाच घेताना पाटीलला रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई कोल्हापूर येथील पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार श्यामसुंदर बुचडे, पोलीस नाईक शरद पोरे, संदीप पावलेकर, आबासाहेब गुंडणके, सर्जेराव पाटील यांनी केली. या बाबत रितसर गुन्हा दाखल केला असून तलाठी, पाटील यास अटक केली आहे.