नागाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेला ‘ सुमित ‘ विरळे गावचा
सोंडोली प्रतिनिधी : पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या आपघातात विरळे ता. शाहूवाडी येथील कु. सुमित संजय कुलकर्णी वय .२३ वर्ष हा सांगली येथील वालचंद कॉलेज येथे इंजिनिअरींग च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या, विद्यार्थ्यांचा दूर्दैवी आपघाती मृत्यू झाला. यामुळे विरळे’ सह संपुर्ण कानसा खो-यातून हळहळ व्यक्त होत आहे.
सुमित कुलकर्णी हा शिक्षणासाठी सांगली येथे रहात होता. शिवजयंती निमित्त आपल्या मित्र मंडळी समवेत ट्क मधून शिवज्योत आणण्यासाठी पन्हाळगडावर आले होते. ते पहाटे च्या सुमारास पन्हाळगडावरुन शिवज्योत घेवून परत जात आसतना पुणे – बेंगलोर महामार्गावर नगाव फट्यानजीक त्यांच्या ट्रक चा आपघात झाला. त्यात सुमित सह त्याचे चार मित्र जागीच ठार झाले.
सुमित कुलकर्णी हा विरळे येथील शेतकरी व सुशिक्षित कुटुंबातील असून आई – वडील सुक्षित असलेने सुमित सुद्धा गावात हुशार विद्यार्थी होता.
प्रथमिक शाळा विरळे, येथे प्रथमिक शिक्षण घेत असताना, सतवीत शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. माध्यमिक शाळेत ही दहावीला ९५ % गुण मिळवुन पहिला आला होता.
सुमित कुलकर्णी हा मन मिळावू स्वभावाचा असल्याने परीसरात त्याचा मित्र परीवार मोठा होतो .सुमितच्या मृत्यू ची बातमी सकाळी सात च्या सुमारास विरळे येथे समजताच, गावांतील शिवजंयती निमित्त आयोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आले, व गावातील सर्व व्यावाहार बंद ठेवण्यात आले. यामुळे विरळे सह संपूर्ण परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सुमितच्या मृत्यूची बातमी कळताच गावांतील मित्र मंडळी व कुलकर्णी कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळाला असून, अंत्ययात्रेला परीसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.
चौकट – हृदय पिटाळून टाकणार आक्रोष – सुमित कुलकर्णी हा एकुलता एक मुलगा व अत्यंत हुषार असल्याने, शाळेत पहिल्यापासून पहीला नबंर काढाणारा गुणवंत विद्यार्थी असल्याने, हाता तोंडाला आलेले पोटच पोर अचानाक निघून गेल्यांने ,सुमित च्या आई वडीलाचा आक्रोष पाहून उपस्थितांना दु:ख आनावर झाले.