निरोगी आरोग्यासाठी सूर्यनमस्कार गरजेचे – महेश विभूते
मलकापूर प्रतिनिधी :
आणि समृध्द जीवनासाठी सुर्यनमस्काराच्या माध्यमातून आपण आपल्या शरीराची विशेषत: आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुर्य नमस्कार करणं गरजेचं असल्याचे प्रतिपादन चैतन्य प्रभात शाखा मलकापूर चे सहकार्यवाहक महेश विभूते यांनी मलकापूर येथे आयोजित सुर्य नमस्कार शिबीर प्रसंगी केले .
राष्ट्रीय स्वयम् सेवक संघ शाहुवाडी तालुका येथील चैतन्य प्रभात शाखा मलकापूर यांच्या वतीने सुभाष चौक मलकापूर येथे सुर्य नमस्कार शिबीराचं आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी सुर्य नमस्कार आणि त्याचे महत्व या विषयी ते बोलत होते. पुढे बोलताना महेश विभूते म्हणाले कि, दिवसें दिवस आपल्याला आपल्या आरोग्यासाठी, सदृढ शरीराकडे पुरेसा वेळ देता येत नाही. मग अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे .आरोग्यासोबतच आपल्या मानसिक मनोबलाची वाढ होण्यासाठी आपण सदैव तत्पर आणि उत्साही राहीलं पाहिजे. यासाठी आपण दररोज सुर्यनमस्कार घालणे आवश्यक आहे. दिवसातील काही तास आपण आपल्या साठी, आपल्या शरीरासाठी दिले पाहीजेत. धावपळीच्या युगात आपले जीवन सुखी आणि समृध्द ठेवण्यासाठी अशा माध्यमाचा वापर करावा, दररोज आपण सुर्यनमस्कार घालावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले .
या सुर्यनमस्कार शिबीरास राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे प्रचारक यांच्यासह युवक सहभागी झाले होते.