तांबवे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू – सत्यजित देशमुख
शिराळा प्रतिनिधी : तांबवे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सामुहिक प्रयत्न करा, लागेल ते सहकार्य करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथे तांबवे गावच्या नूतन उपसरपंचपदी विक्रम चव्हाण यांची निवड झाल्याबददल आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी देशमुख म्हणाले,या गावाला वेगळी परंपरा आहे. गावाच्या विकासासाठी आमदार शिवाजीराव देशमुखसाहेब यांच्या माध्यमातून विकास निधी देण्याबरोबर व्यक्तिगत पातळीवर सहकार्य केले आहे. येथे कुस्तीची परंपरा असल्याने लोकांच्या मागणीनुसार १० लाख रुपये खर्चून व्यायामशाळा उभारली आहे. गावातील अंतर्गत रस्ते, आर.सी.सी.गटर या कामासाठी निधी दिला आहे. या गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने हातात हात घालून काम करावे.
यावेळी बाजार समिती संचालक सुजित देशमुख, मांगले उपसरपंच धनाजी नरुटे, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील, सुरेश चव्हाण, उत्तम चव्हाण, विजय पाटील, उत्तम पाटील, रोहित पाटील, अवधूत पाटील, शंकर शेळके, सचिन निकम, काशिनाथ निकम, संजय पाटील, विक्रम हसाळे, हणमंत हसाळे उपस्थित होते.