बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणी ट्रॅक्टर व जे.सी.बी.जप्त केला
शिराळा प्रतिनिधी : मांगले ( ता.शिराळा ) येथील बेकायदेशीर मुरूमाचे उत्खनन करून मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त करण्यात आले आहेत.
शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मांगले येथील गट नंबर ७७/२ लगत असलेल्या कालव्यावरील मुरूमाचे उत्खनन सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मंडल अधिकारी भानुदास साठे , तलाठी लहूदास चौधरी , संतोष पवार , मारुती सातपुते हे घटनास्थळी गेले. त्यांना पाहून ते पळून गेले . प्रवीण पांडुरंग नरुटे ( रा. मांगले) यांनी चाळीस ब्रास मुरूम नेल्याची खात्री झाल्यावर कारवाई करून एक जेसीबी (क्रमांक के ए २८ एच ६०६७ ) व दोन ट्रॅक्टर ट्रॉली सह शिराळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तहसीलदार दीपक शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मंडल अधिकारी प्रकाश सूर्यवंशी फिर्याद दिली आहे.