वांद्रे येथील शासकीय इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना : दोन जण जखमी
मुंबई : वांद्रे येथील शासकीय इमारतीतील एका इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आहे.यात दोघे जखमी झाले आहेत. हि घटना आज दि.१२ जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. जखमींवर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि,आज पहाटे ४.३० वाजण्याच्या दरम्यान वांद्र्याच्या बी- २९५/५ या इमारतीत ही घटना घडली. या इमारतीतील सावंत कुटुंबीय झोपेत असताना अचानक स्लॅब अंगावर कोसळल्याने वैशाली योगेश सावतं आणि नैतिक योगेश सावंत हे दोघेही गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत दोन्ही मायलेकरांच्या अंगाला आणि हाताला मार लागाला असून दोघांनाही उपचारासाठी तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वांद्र्यातील शासकीय इमारतीची पडझड सुरू झाल्याने या इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.