वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वारणानगर :
गेल्या ७ ते ८ दिवसांत कोल्हापूर, सांगली जिल्हा आणि परिसरात पावसाची संतत धार सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. धरण क्षेत्रातही मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने , वारणा नदीवरील चांदोली धरण ८२ टक्के भरल्यामूळे, आज सकाळपासून साधारणपणे १ हजार ते २ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदी पत्रात करण्यात आल्याने, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
वारणा नदी धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं ३४ टीएमसी चे चांदोली धरण आता ८१ टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी ६१८ . ६० मीटर इतकी पोहचली असून, पाणी पातळी सांडव्या पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे आज सकाळपासून वारणा नदी पात्रामध्ये, पर्जन्यमानानुसार १ हजार ते २ हजार क्युसेक्स इतका पाणी विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनांन सतर्कतेचा इशारा दिला आहे.