वारूळ मध्ये २५९ मतांनी ‘ दारू ची बाटली ‘ आडवी
मलकापूर : वारूळ तालुका शाहुवाडी इथ दारूबंदी साठी झालेल्या मतदाना मधून आडव्या बाटली च्या बाजूने २५९ मतदान झाले. आणि वारूळ मधून दारू हद्दपार झाली.
या दारूबंदीसाठी गावातील तरुण मंडळानी प्राधान्याने प्रतिनिधित्व करीत गावातून दारू हद्दपार केली.
वारूळ इथ आज दारूबंदीसाठी ४६० मतदार होते. पैकी २९२ मतदान झाले असून, उभ्या बाटलीसाठी १७ मते मिळाली, तर आडव्या बाटलीसाठी २५९ मतदान झाले. एकूण १६ मते बाद झाली.