राजकीय

सासूबाईंच्यानंतर सुनबाई होणार ‘ कारभारीण ‘

पैजारवाडी : वेखंवाडी (ता पन्हाळा )येथील ग्रामपंचायत, पंचवार्षिक निवडणूकित पन्हाळा पं. स. सदस्य अनिल कंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्यांदा बिनविरोध झाली असून, पहिल्या लोकनियुक्त थेट सरपंच होण्याचा मान सौ.शुभांगी उत्तम कंदुरकर यांना मिळाला आहे.
तर सदस्य पदाच्या सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाले.
त्यामध्ये सुनील रघुनाथ खोत, पांडुरंग शामराव खोत, हौसाबाई आनंद खोत, सखुबाई भगवान खोत, पुष्पा विठ्ठल पंदारे, अमृता अजित कंदुरकर, स्वाती विलास खोत, यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

गतवर्षीप्रमाणे याही पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पक्षाना एकत्र करत ग्रामस्थांना विश्वासात घेवून पन्हाळा पं.स.सदस्य कंदुरकर यांना बिनविरोध करण्यात यश मिळाले आहे.
यापूर्वी पंचायत समिती निवडणुकीत सगळं गाव जनसुराज्य शक्ति पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आल्याने, ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते.
प्रथमच थेट लोकनियुक्ती सरपंच पदांची निवडणूक होत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता होती. पण पुन्हा एकदा ग्रामस्थांनी एकी दाखवत गटातटाचे राजकारण न करता सर्व नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे ठरले, आणि सरपंचपदासाठी उच्चाशिक्षीत महिलेची निवड करून, इतर ग्रामपंचायती पुढे आदर्श ठेवला आहे.
थेट लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झालेली पन्हाळा पूर्व परिसरात ही पहिली ग्रामपंचयात आहे.
याप्रसंगी बोलताना नूतन सरपंच शुभांगी कंदुरकर यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. सर्वाना बरोबर घेऊन गावाचा सर्वागीण विकास करणार असंल्याचे सांगितले .
ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी आनंद खोत, तानाजी खोत, शहाजी खोत, आनंद पोवार, जोतीराम खोत, बळवंत खोत, यशवंत पंदारे, धोंडीराम खोत, धनाजी खोत, सखाराम खोत, संतोष खोत, यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट :-
सासूबाईंनंतर सूनबाई पाहणार ग्रामपंचायतीचा कारभार
वेंखडवाडी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये बिनविरोध निवड झालेल्या प्रथम लोकनियुक्त सरपंच शुभांगी कंदुरकर यांच्या सासूबाई विमल कंदुरकर यांनी दोनवेळा ग्रा.पं सदस्य पद भूषवले असून, त्यांनी दहा वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!