विद्यामंदिर वेखंडवाडी शाळेचे यश :श्री. माने व बिसेन सरांचे सर्व स्तरातून कौतुक
पैजारवाडी प्रतिनिधी :-
पणूत्रे (ता.पन्हाळा) येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यामंदिर वेखंडवाडी (ता.पन्हाळा) या शाळेतील शिक्षकांनी तृतिय क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले.
विद्यामंदिर वेखंडवाडी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश माने यांनी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात “लोकसंख्या शिक्षणावर” आणि शिक्षक गुलाब बिसेन यांनी “गणित विज्ञान” या विषयावर सादर केलेल्या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला .
एकाच शाळेतील दोन्ही शिक्षकांनी मिळवलेल्या या यशामुळे सर्वच स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे.