ग्रामसेवक विजय पाटील यांचे हृदय विकाराने दु:खद निधन
बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी येथील श्री.विजय दिनकर पाटील (ग्रामसेवक ) यांचे आज पहाटे हृदय विकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. यामुळे परिसरात हळहळ पसरली आहे.
विजय पाटील हे अतिशय हुशार, चाणाक्ष,मनमिळावू व कष्टाळू ,व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या स्वभावाच्या गुणधर्माने अतिशय मोठा जनसंपर्क गोळा केला होता. शाहुवाडी पन्हाळा तालुक्यात सुद्धा त्यांचा मोठा संपर्क होता. ते सध्या वडणगे ता.करवीर येथे सध्या कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने त्यांनी जमवलेल्या मित्र वर्गाला एक धक्का बसला आहे. कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याचा त्यांचा बाणा कौतुकास्पद होता. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,हीच ईश्वरचरणी प्राथर्ना …सा.शाहुवाडी टाईम्स व एस.पी.एस.न्यूज कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.