विश्वास समूहाच्यावातीने पत्रकारांचा गौरव
शिराळा प्रतिनिधी : यशवंत नगर -चिखली तालुका शिराळा जि.सांगली येथील विश्वास उद्योग समूहाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे ‘ ६ जानेवारी ‘ या पत्रकार दिनी लाखाचे अपघाती विमा संरक्षण देवून समस्त पत्रकार बांधवांचा गौरव करण्यात आला.
यावेळी भाटशिरगाव तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स क्लब च्या सांस्कृतिक हॉल मध्ये शिराळा, वाळवा, शाहुवाडी तालुक्यातील विविध दैनिकांच्या पत्रकारांना प्रचीती दुध संस्थेचे अध्यक्ष व चिखली गावचे सरपंच राजेंद्र आबा नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे व विश्वास चे कार्यकारी संचालक राम पाटील यांच्या हस्ते अपघाती विमा संरक्षण पत्र देवून गौरव करण्यात आला. लोकनेते फत्तेसिंगराव नाईक एंडोमेंट ट्रस्ट कडून देण्यात आलेल्या या विमा संरक्षणामध्ये प्रत्येकी १ लाख रुपये पर्यंतचा अपघाती विमा व अपघातातील उपचारासाठी ठराविक रक्कम असे या सर्वसाधारण संरक्षण विम्याचे स्वरूप असून देण्यात आलेल्या या विमा संरक्षण रकमेत चालू वर्षी वाढ करण्यात आल्याचे साभार पत्र पत्रकारांना सुपूर्द करताना विश्वास उद्योग समूहाच्यावतीने माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी शुभेच्छा संदेशही दिला आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या विभागीय सदस्य नारायण घोडे, सांगली जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड, शाहुवाडी तालुका पत्रकार संघ अध्यक्ष सुभाषराव बोरगे, शिराळा तालुकाध्यक्ष निकम, या नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार हि करण्यात आला.पत्रकार गौरव कार्यक्रमात विश्वास चे कार्यकारी संचालक राम पाटील, पत्रकार रमेश डोंगरे, विजय लोहार, विनायक गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केलीत. तिन्ही तालुक्यातील सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष, पदाधिकारी, सर्व वृत्तपत्राचे प्रतिनिधी , वार्ताहर उपस्थित होते. चंद्रकांत मुदुगडे यांनी आभार मानले.