उज्वल भविष्याकडे टाकलेले महत्वाकांक्षी पाऊल : विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय
बांबवडे : विश्वास विद्यानिकेतन म्हणजे उज्वल भविष्याकडे टाकलेले महत्वाकांक्षी पाऊल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विश्वास वूद्यानिकेतन निवासी शाळा चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली. हि शाळा आपल्या कष्टाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मळा आपल्या घामाचे शिंपण करून फुलवीत आहेत.
https://youtu.be/MSIlHZKnFJA?list=PLw6g8tv1dyZU1UJ6t3btp6QOom-eY73gE
ह्या शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर भार दिला जातो म्हणून इथला दहावीचा निकाल नेहमी १०० % असतो.यावरून इथला शिक्षकवृंद आपल्या विद्यार्थ्यांवर किती कष्ट घेतात हे दिसून येते. एवढेच नव्हे तर इतर उपक्रम सुद्धा चान्ग्ल्यापाधातीने राबविले जातात. शैक्षणिक बाबतीत विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त सुद्धा वयैक्तिक रित्या त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला जातो. त्यांना लायब्ररी , तसेच संदर्भ पुस्तकांचे सुद्धा ज्ञान दिले जाते. विद्यार्थी आपल्या शालेय दशेत कुठे कमी पडू नये,यासाठी प्राचार्य एस.बी.देसाई आणि त्यांचे शिक्षक सहकारी सातत्याने काळजी घेतात.
यासर्वांबरोबरच खेळाचे शास्त्र शुद्ध प्रशिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना दिले जाते. इथ संपूर्ण वर्षाचे नियोजन कालबद्धतेने केलेले असते.त्यामुळे अनुशासन प्रभावी पणे राबवले जाते. इथे दाखल केलेला विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेसह खेळ,संगीत, गायन, आदींचे देखील ज्ञान ग्रहण करतो. त्यामुळे इथला विद्यार्थी म्हणजे भविष्यातील प्रभावी प्रशासकीय अधिकारी बनेल यात शंका नाही. इथले निसर्गरम्य वातावरण विद्यार्थ्यांना नैसर्गिक उर्जा देत असते. त्यामुळे विश्वास विद्यानिकेतन च्या शैक्षणिक संकुलाला एकदा भेट द्या,असे आवाहन प्राचार्य एस.बी. देसाई यांनी केले आहे.