वारणा कृषी भूषण पुरस्कार वितरण सोहळा उसाहात संपन्न
कोडोली प्रतिनिधी: वारणानगर ता.पन्हाळा येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाच्या कृषी पुरस्कार सोहळा व पीक परिसंवादाचे उदघाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे-पाटील व माजी मंत्री डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.वारणानगर येथे गेली चार दिवस सुरू असलेले वारणा उद्योग समूह आयोजित कृषी प्रदर्शनात आज सहकार स्व.तात्यासाहेब कोरे कृषी भूषण व स्व.सावित्री आक्का कोरे कृषी लक्ष्मी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते कृषी पुरस्कार देण्यात आले.यामध्ये छगन गणपती बच्चे (सावर्डे), संजय हिंदुराव पाटील (चावरे),बाबुराव रघुनाथ मोहिते(घुणकी),जगन्नाथ रामा गुरव(ऐतवडे खु.),आनंदा केरू पाटील(सांगाव) यांना सहकार महर्षी स्व.तात्यासाहेब कोरे कृषी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले तर सुनीता उमेश बुढे (कोडोली),आशारणी प्रकाश माळी(अंबप),संगीता भिकाजी मुळीक(टोप),मनीषा धनाजी गायकवाड(येलूर),पार्वती राजाराम शिंदे(चिकूर्ड) यांना स्व.सावित्री आक्का कोरे कृषी लक्ष्मी या पुरस्काराने गौरविण्यात आले.तसेच यावर्षी जेष्ठ हवामान तज्ञ डॉ.रामचंद निवृत्ती साबळे यांना स्व.विलासदादा कोरे कृषी तंत्रन पुरस्काराने गौरविण्यात आले.डॉ साबळे यांनी पीक परिसंवाद या विषयावर व्याख्यान दिले.यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यास कारखान्याचे संचालक,अधिकारी,कर्मचारी वर्ग तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.