येळाणे च्या सरपंच पदी मधुकर पाटील, तर उपसरपंच पदी भरत पटेल
मलकापूर प्रतिनिधी :
येळाणे तालुका शाहुवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी थेट जनतेतून भाजप शिवसेनाआघाडीचे मधुकर केशव पाटील यांची तर उपसरपंच पदी भरत उर्फ सुरेश हरिदास पटेल यांची निवड झाली.
सरपंच पदी मधुकर पाटील यांची थेट जनतेतून सरपंच पदी निवड झाली आहे, तर उपसरपंच पदाची निवडणुक प्रक्रिया सरपंच मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक यशवंत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रोहीत जांभळे, महेश जांभळे, सदस्या कमल मोरे, साक्षी भोसले, पूनम भोसले, अर्चना गायकवाड आदिसह, भिकशेठ भोसले, विश्वास मोरे, विजय मोरे, भास्कर बोडके, अरविंद यादव यांच्यासह ग्रामस्थ, युवक उपस्थित होते .
निवडी नंतर नुतन पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.