२१ जून गुरुवार योगदिवस संपन्न करू : संकल्प प्रभात,प्रजापिता ब्रम्हाकुमारी
बांबवडे : २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ योगदिवस ‘ म्हणून पाळला जातो. याचेच औचित्य साधून बांबवडे तालुका शाहुवाडी येथील महादेव मंदिरात संकल्प प्रभात शाखा बांबवडे, व प्रजापिता ब्राम्हाकूमारी यांच्या संयुक्त विद्यमान ‘ योगदिवस ‘ साजरा केला जाणार आहे. जगातील जवळ,जवळ सर्वानीच योगाचे महत्व स्वीकारले आहे. म्हणूनच या योग दिवस कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : महादेव मंदिर बांबवडे
दिनांक : २१ जून गुरुवार
वेळ :सकाळी ६ वाजून १५ मिनिटे