कोल्हापूर जिल्हा गुरव संघटनेच्या उपाध्यक्ष पदी मलकापूर चे अजय गुरव यांची नियुक्ती
मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय गुरव यांची कोल्हापूर जिल्हा गुरव संघटना च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या व तालुका अध्यक्ष पदी सदानंद गुरव यांच्या नियुक्तीबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.

अखिल गुरव समाज संघटना चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. आण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, महिला जिल्हाध्यक्षा सुनिता गुरव यांच्या १ जुलै २०२३ रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा व तालुकास्तरीय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

या मध्ये अजय गुरव यांची अखिल गुरव संघटना कोल्हापूर जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदी, तर तालुका अध्यक्ष पदी सदानंद गुरव यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

यावेळी गुरव समाजातील प्रश्न, समाजाचे एकजूटीकरण, या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस शाहुवाडी तालुक्यातील गुरव समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.