स्व.खास.उदयसिंगराव गायकवाड यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन
बांबवडे : स्व. खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या २८ ऑगस्ट या जयंतीदिना चे औचीत्त्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी बांधकामाचा शुभारंभ ‘उदय साखर’ च्या कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सत्यजित पाटील सरूडकर होते. त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तर यावेळी अथणी शुगर्सचे श्रीमंत पाटील हे देखील उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष पृथ्वीराज खानविलकर, रणवीर सिंग गायकवाड, महादेवराव पाटील कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, हंबीरराव पाटील जिल्हापरिषद सदस्य, विजय बोरगे जिल्हापरिषद सदस्य, नामदेवराव पाटील सावेकर पंचायत समिती माजी उपसभापती, डॉ. स्नेह जाधव शाहुवाडी पंचायत समिती सभापती,कर्मचारी वृंद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.