बांबवडे त ” गांजाची ” राजरोस विक्री ? : शाहुवाडी पोलीस लक्ष देणार का ?
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ” गांजा ” पुरविणारी टोळी कार्यरत असून, इथली पिढी गांजा च्या आहारी गेल्याचे निदर्शनास येत आहे. तरीदेखील येथील पोलीस यंत्रणा मात्र सुस्त आहे. कि सुस्त असल्याचे ढोंग करीत आहेत, असा प्रश्न नागरीकांतून विचारला जात आहे.

गेली अनेक महिने बांबवडे इथं गांजा सारखे अंमली पदार्थ पुरविले जात असून, नवी पिढी या गांजा च्या आहारी जाताना दिसत आहे. असे असूनसुद्धा इथली पोलीस यंत्रणा मात्र निवांत आहे. विशाळगड इथं उघड्यावर मद्यपान करताना काही इसमांना पकडले असून, त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आली.

परंतु ज्या अधिकाऱ्यांनी हि कारवाई केली, तेच अधिकारी बांबवडे इथं कार्यरत असूनसुद्धा याचा बंदोबस्त त्यांच्याकडून होत नाही, हि गोष्ट दुर्दैवाची आहे. पोलीस यंत्रणांनी बांबवडे कडे सुद्धा लक्ष द्यावे. इथं अनेक उद्योग बेकायदेशीरपणे निवांत सुरु आहेत. बांबवडे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर मोबाईल वरून आकडा घेतला जातो, हे पोलिसांना माहित नाही हि गोष्ट हास्यास्पद आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावे. आपली यामागील कारकीर्द उत्तम झाली आहे. आपल्या मागील कारकीर्दीवर डाग लागू नये, याची काळजी घेतली, तर बांबवडे बेकायदेशीर धंद्यापासून मुक्त होईल. आणि येथील नवी पिढी अमली पदार्थ्यांच्या विळख्यात अडकणार नाही. याची गांभीर्याने नोंद पोलीस खात्याने घ्यावी, अशी नागरिकांच्यावतीने विनंती करण्यात येत आहे.

एकीकडे वाहतुकीच्या कोंडीची फोड करण्याचा शब्द देवून सुद्धा, अद्याप याबाबत कोणतीही कारवाई पोलीस खात्याकडून झाल्याचे दिसत नाही. याचीसुद्धा शाहुवाडी पोलिसांनी नोंद घ्यावी.