” ते ” अज्ञात वाहन गणेश बेकरी नांदणी चे
बांबवडे :
दि.१३ मार्च रोजी रात्री ७ ते ८ च्या सुमारास तानाजी तोरस्कर यांच्या दुचाकीस ठोकरलेले चार चाकी अज्ञात वाहन गणेश बेकरी नांदणी तालुका शिरोळ येथील आहे. वाहन व चालकास शाहुवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि,जमादार एजन्सी चे इम्तियाज नजीर जमादार वय ३४ वर्षे हा ते वाहन चालवत होता. त्यावेळी खुटाळवाडी जवळ त्याने ठोकरल्याने, तानाजी तोरस्कर यांच्या वाहनास अपघात झाला. आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. रक्षाविसर्जन उद्या दि.१५ मार्च रोजी सकाळी १० वा.पिशवी ता.शाहुवाडी इथं आहे.