अखेर छत्रपतींचा पुतळा हटवला : उद्या १३ ऑक्टोबर रोजी शाहुवाडी तालुका बंद
बांबवडे : बांबवडे ता. शाहुवाडी इथं अज्ञात शिवप्रेमींनी बसवलेला पुतळा अखेर प्रशासनाने त्यांची ताकद वापरून हटवला. यामुळे बांबवडे परिसरातील शिवप्रेमी जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आजची पहाट उत्सुकतेने उगवली. सकाळी बांबवडे एसटी स्थानकाच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर दिवसभर पोलीस फौजफाटा, पुढाऱ्यांचा राबता होता. संध्याकाळी माजी आमदार सत्यजित पाटील, आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, नामदेवराव गिरी आदींसह शिवप्रेमींना शाहुवाडी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर प्रशासनाने हा पुतळा अखेर हटवला.
एकंदरीत पुतळा कोणी बसवला माहित नाही, परंतु हटवताना मात्र प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाला झटका बसला. राज्यात सत्ता शिवसेनेची आहे, हमी शिवसेनेचे माजी आमदार देत असतानाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला गेला. यासारखे दुसरे आश्चर्य ते काय असावे.
दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेवराव गिरी यांनी उद्या दि.१३ ऑक्टोबर रोजी शाहुवाडी तालुका बंद ची हाक एसपीएस न्यूज शी बोलताना दिली आहे.