६ जून च्या शिवराज्याभिषेक साठी अनेक शिवभक्त मावळे सज्ज
आसुर्ले : ६ जून रोजी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मावळे सज्ज झाले असून,पन्हाळा,भुदरगड,रांगणा किल्ल्यावरून शिवराज्याभिषेक साठी पाणी आणले जाणार आहे.
रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक दिनी अभिषेक घालण्याकरिता विविध किल्ल्यावरून पाणी आणले जाणार आहे.
हे पाणी ४ जून रोजी सकाळी रायगडाकडे घेवून जाण्यात येणार आहे. यामध्ये येथील दिलीप पाटील, शिवाजी खोत, अमर घाटगे, प्रवीण कारंडे, राहुल पाटील, शिवप्रसाद शेवाळे, अक्षय पाटील, उदयबाबा घोरपडे, आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत .तसेच हजारो शिवभक्तांनी या उपक्रमात सामील व्हावे , असे आवाहन हि यावेळी संयोजाकांच्यावातीने करण्यात आले आहे.